जगू की मरू
जगू की मरू
दगडाला जीव लावून काय करू
कोणी नाही माझं जगू की मरू...
उगीच कुणाचा सोयरा बनून काय करू
माझे नाही नातेवाईक कोणाचे पाय धरू....
मी माझं जगात नावं करून काय करू
मी एकटा कोणाचा हात धरून फिरू....
डोळ्यात अश्रू आणून मी काय करू
झाली बेरंग भावनां दुखाचा गिरवितो गेरू....
माझ्या मनातच नाही काही काय करू
दुर झाले आपले मी कोणासाठी झूरू....
जीवात राहिला ना जीव काय करू
आली सरणावर लाकडं झालं मरणं सुरू....
