जगुन पहावे
जगुन पहावे
जगुन पहावे पक्षांसारखे
ज्यांना भीती नसते उंचीची
जगता जगता कळू लागते
लांबी आपल्या आयुष्याची
आराम करूनी न मिळे लाभ
आयुष्याच्या या शाळेला
कष्ट असे एकमेव पर्याय
यशाच्या या नाळेला
घे पुढाकार हो मोठा
जगण्याच्या या शर्यतेत
कसुनी कंबर ये अव्वल तू
आयुष्याच्या नावेत
जीवनाच्या या शाळेने
शिकविले चांगलेच धडे
भर तुझ्या यशाचा घडा
टाकुनी मोलाचे खडे
आयुष्य पुढे सरकेल
उद्या करता करता
घे निर्णय तू आजच
तुझ्या जगण्याकरता
