STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

2  

Meenakshi Kilawat

Inspirational

जगायचे राहूनच गेले..

जगायचे राहूनच गेले..

1 min
553


खट खट खटतोय स्वप्न बघतोय 

तीर हातून कधी निसटतोय

आपणास लक्षातच येत नाही आणि

अमुल्य आयुष्य जगायचेच विसरतोय...!!


खुप जगायचे अन् स्वस्थ रहायचे

सुखाच्या जगाला नाही सोडायचे 

काय मिळवलय काय गमवलय

कारण शोधण्यात आयुष्य नाही घालवायचे !!


 आनंदाने जगायचे असेल तर

नाही बघायचे मागे वळून पुन्हा

जीवनाच्या लढ्यात हिमत करून 

ध्येयमार्गावर ठेवा आपल्या पाऊलखुणा .!!


 आयुष्यात निश्चित करावे लक्ष्य

आठवणीच्या निघावे जाळ्यातुनी

गमती जमतीने काबिज करावी मने  

इतरांची दु:खे जाणावे जगण्यातूनी.!!


आप्तांचे उत्सव जन्मदिवस मनवितो

आणि बालपणी निर्धास्त जगतोय

तारुण्यात जवाबदारीची न्यारीच रंगत

वार्धक्य येतं जगायचे राहूनच गेले म्हणतोय


जरी आपल्याविणा काही कुणाचं 

कधीच अडत नाही तरीपण

कर्त्याचा भाव मी-पणाचा अभिमान 

जगायचे राहूनच जातं जीवनात पण .!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational