जगावेगळी
जगावेगळी
ऐका हो आज, कहाणी हि तिची आगळी.....
ती जगात राहूनही, असे मग जगावेगळी.....
तीच आजची दुर्गा, आणि तीच भासते काली.....
ठेवत असते तीच, साऱ्यांची ख्याली खुशाली.....
कधी करी माया, कधी आणि डोळ्या पाणी.....
कधी बनत असे मग, ती झाशी वाली राणी.....
करी प्रेम साऱ्यांवर, करून दुसऱ्याची चाकरी.....
किचेन मध्ये राबतसे, सर्वांना मिळण्या भाकरी.....
दूर ठेवीतसे हो मुद्दाम, ती स्वतःचे सारेच छंद.....
जपण्या साऱ्यांच्या, चेहऱ्यावरचा तो आनंद.....
आवडे तिलाही पोहणे, गायन आणि वाचन.....
येता मनी आठवण, आक्रंदते हो तिचे मन.....
करी प्रेमाने सार, करी रोज ती धावाधाव.....
सुटण्याच्या वेळीच येई, काम मग वाढावं.....
रोजच होते तिची ही, तारे वरची कसरत.....
स्वतःकडे बघायला, नसे तिला फुरसत.....
दुसऱ्यांच्या आनंदाने, होई खूप तिला हर्ष.....
नाही कळलं मग,सरली वर्षा मागून वर्ष.....
आजारपणात कुणाच्याही, रात्र जागून काढली.....
तिची मात्र तब्येत मग, दिवसेंदिवस खालावली.....
तिच्या मनाची स्पंदन, कुणीच नाही जाणली.....
देवी म्हणून ती नेहमीच, दुर्लक्षितच राहिली.....
ठेवलं तिला नेहमीच, परंपरांच्या जोखडात.....
तिच्याकडून अपेक्षा, निभवावी रीत- भात.....
तिनेच द्यावा जन्म, करावं पालन पोषण.....
डोळ्यात मात्र खुपे, तीच ते सुंदर दिसणं.....
तिच्याही असतात काही, अपेक्षा वेड्या.....
पायात पडल्या मात्र, नियमांच्या बेड्या.....
देवी म्हणून तिच्यावरच, अत्याचार करणं.....
तिचा चिमुकला जीव, पोटातच संपवणं.....
बंद करा हे नाटक, सर्व सोंग - ढोंग करणं.....
मुठीत ठेवण्याची तिला, शोधू नका कारण.....
सहन करा हो तिचं, कधी लटक रागावणं.....
आठवा तीच, न सांगताही मन ओळखण.....
तिचं असे दुर्गा, आणी तिचं महिषासुरमर्दिनी.....
तिच्यामुळेच असे, आनंद तुमच्या हो जीवनी.....
तीच्यापोटी जन्म घेऊन, होती सर्व धन्य.....
तिच्यामुळेच असतं ना, घरात धन धान्य.....
ती असे मंगल, कल्याणकारी, तिचं असे पवित्र...
तिच्याशिवाय रखडती, मग घराची सारीच सूत्र.....
अशी ही आजच्या स्त्रीची, कहाणी हि वेगळी.....
सामावून ही ह्या जगात, असे ती जगावेगळी.....
