STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

जेव्हा मिळेना अमृत

जेव्हा मिळेना अमृत

1 min
199

स्पर्शातुनी सापडती सुख

हे जीवन सुंदर व्हावे गीत

पुर्णत्व नाही कुणास येथे

रंगातुनी सापडती मीत...


क्षणाक्षणातून पारस शोधीत

जागृत आशेचा भास नकळत

अद्भूत रसपान करतो भ्रमर हा

तनामनातून आक्रोश चितारुन...


हा स्पर्श होता फुलाफुलातुनी

अवघेची घडती जीवन दर्शन

सांडे मधुर कोमल पाकळ्या

रसारसातून भरूनी कणकण...


नाही सुखाची काही किमया

झरते मनाच्या आत निरंतर

रंग सांडते चंचल गात्री अन्

अंतरातून झरते रमून भरभर...


शोधूनही जेव्हा मिळेना अमृत

सारे विश्व येतो जो फिरून

विचारतो जो प्रश्न सिकंदर 

माहित नसते जवळ असून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance