STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy Others

4  

Umakant Kale

Tragedy Others

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

1 min
585

सुरकुत्या रे पडल्या

म्हणे वय झाले माझे...

अनुभव जगी आता

कमी कुठे बघ माझे...


सुख दुख येणे जाणे

किती मी पाहिले येथे..

मोल जीवनाचे कळे

हात भाजले रे येथे..


शिक्कामोर्तब रे झाला

जेष्ठ नागरिक म्हणे...

तारुण्याचे बालपण

मुखी सारे गीत म्हणे..


थकूनी आता बसलो

तुटेल श्वास हा कधी. ...

येईल मी पुन्हा गड्या

हवी मला रे ती संधी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy