*जाळून स्वप्नं माझी
*जाळून स्वप्नं माझी
जाळून स्वप्नं माझी ठिणगीने
संसार माझा गड्यांनो मोडू नका.
धगधगतं जाळा मलाही.
राख स्वप्नांची गोळा करण्यास
मला मागे सोडू नका.
_______
उडवून ती राख फूफाटा.
फेर धरतो तूफ़ान एकटा.
करतोस दाणादाण वादळा.
ने उडवून हा गुलाल सगळा.
ने उडवून मलाही, करतो आव्हान तूलाही.
राख, धूळ स्वप्नांची चाळण्यास.
मला एकटा सोडू नको.
___________
अवखळ बरसणाऱ्या मेघराजा.
तू धुवुन टाक आठवणी माझ्या.
घालतो मी तुलाही एक साकडे.
ने पुरात वाहून स्वप्नांचे सांगाडे.
बुडविन संसार ही तर रीत तुझी.
ही रीत तुझी रे तू तोडू नको.
तिच्यावीन गोता खाण्यास एकटा सोडू नको.
___________
