STORYMIRROR

Dinesh Kambale

Others

2  

Dinesh Kambale

Others

सखे तुझा गं दुरावा

सखे तुझा गं दुरावा

1 min
14.5K


सखे तुझा गं दुरावा.

भारी छळतोया मला...

वाटे पाखरू बनुनी.

यावे भेटायाला तुला...

________:_____ ___

दिन रात मनामध्ये.

उठे भीतीचं काहूर...

तुला पाहण्यास प्रिये.

होई जीव हुरहूर...

_____________ ____


योग वियोगाचा आला.

अन झाली ताटातूट...

तुझ्या मिलनां गं प्रिये.

वेडं काळीज हें तूट....

___________________


तुझ्या सोबतीची मला.

होती जन्मभर आशा....

तुझ्या जाण्याने सजनी.

पाहा आली अमावस्या.

____________________


एक मागने देवाला.

क्षण मिलनाचा यावा...

तूला घेऊनी कवेतं.

संपवावा हा दुरावा...

___________________



Rate this content
Log in