Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kambale

Others

4  

Dinesh Kambale

Others

सय माहेरची येता...

सय माहेरची येता...

1 min
13.7K


सय माहेरची येता...

मन पाखरू हे झालं

क्षणभर माहेराला

बाई फिरुनी ग आलं

____________________

बाप कष्टाळू तो माझा.

उभ्या घराचा ग खांब....

पाहे कौतूक सोहळा.

उभा राहुनिया लांब...

____::__:::___________


आई माऊली ती भोळी.

माझी वेणी बांधताना...

खुले साजरे तें रूप.

खानावळ रांधताना..

____________________


ओसरीत ऊभा दिसे.

भाऊराया तो धाकटा...

आले नांदायाला बाई.

त्याला सोडूनी एकटा...

____________________


बाई बहिणीच्या खोड्या.

नित्य आठवती मला....

तिच्या सुख दुःखाकडे.

जीव माझा हा लागला..

____________________


आज्जी माझी ती मायाळू.

खाटेवरी ग बसूनी...

गोष्टी ऐकावल्या मला .

तीने हसूनी खेळूनी .....

___________________


झोके आमराईतले.

जेव्हा भीडे गगनाला...

काय सांगू बाई किती

होई आनंद मनाला...

___________________


सय माहेरची येता.

मन पाखरू हें झालं...

माहेरची सारी बात.

संगे घेऊनीया आलं ...

____________________



Rate this content
Log in