STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy

3  

Ganesh G Shivlad

Tragedy

जा परतुनी तू..!

जा परतुनी तू..!

1 min
255

या वर्षी जरा ती जास्तच रमली,

खूप खूप खेळली बागडली..!


हसत खेळत खूप खूप बरसली,

सारी धरणी माय सुखी केली..!


यायचं होतं तिला माहेराला,

पंचमी गौरी गणपती सणाला..!


पण आधीच आली वटपौर्णिमेला, 

ओढ लागून आईच्या भेटीला..!


झाले सारे तिचे सण साजरे, 

अजून हौस तिची नाही पुरली..! 


परतून काही गेलीच नाही,

आता दसरा दिवाळी आली..!


पण आता....


माहेर सोडून सासरी जाताना,

बाई लेकीचा त्या तोल सुटला..!


निरोप घेताना धरणी मातेचा,

बांध अश्रुचा अजून फुटला..! 


रडली खूप हमसून हमसून, 

अश्रुंना वाट मोकळी केली..!


अश्रुंच्या त्या भीषण पुरात,

सारी शेती पिके वाहून गेली..!


गुरे ढोरे अन् चारा धान्य, 

काहीच शिल्लक उरले नाही..!


होत्याचे नव्हते घडून गेले,

तरी पाय तिचा निघाला नाही..!


हात जोडतो आता माय बाई,

खूप झाले तुझे हे माहेरपण..!


नको रडू माझी वर्षाराणी,

जा लवकर सासरी परतून..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy