STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Abstract

2  

Tushar Chandrakant Mhatre

Abstract

इये मुंबईचे नगरी

इये मुंबईचे नगरी

1 min
3.0K

प्रजापतीने ब्रम्हदेवाने

पृथ्वीवरी केली स्वारी,

मृत्यूलोकी धावून आला

इये मुंबईचे नगरी


प्रजापतीने ब्रम्हदेवाने

पेरली जीवसृष्टी जरी,

सजीव होते निस्तेज

विषाणूंचे तण भारी


प्रजापतीने ब्रम्हदेवाने

विचार पहा कैसा केला,

कटेवरच्या मोबाईलने

वैकुंठाला कॉल गेला


प्रजापतीने ब्रम्हदेवाने

पालनकर्त्याला जाब केला,

“कोण आहे जबाबदार

मानवाच्या या परिस्थितीला?”


प्रजापतीने ब्रम्हदेवाने

नंबर दुसरा फिरवला

“का नेतोस कैलासाला?”

प्रश्न होता संहारकर्त्याला


प्रजापतीे ब्रम्हदेवाने

थांबवली पृथ्वीची भेट

देवांकडून मिळाले जेव्हा

उत्तर अगदी थेट


प्रजापतीने ब्रम्हदेवाने

निवाड्याचा मेसेज केला 

“मानवच आहे जबाबदार

मानवाच्या परिस्थितीला!”


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Abstract