इतकी मला तू आवडलीस
इतकी मला तू आवडलीस
तू स्वप्नात आलीस...
नि झोप उडून गेली...
तू जीवनात आलीस...
नि आयुष्याला नवी
दिशा मिळाली..!!!
प्रेमाचं रोपटं माझ्या
हृदयात लावून गेलीस...
नव्या भावविश्वाची
नवी ओळख होऊन गेलीस..!!
नकळत ओली प्रीत
मनी जेव्हा फुलली...
तेव्हा माझ्या हृदयपुष्पाची
फुलराणी तू झालीस..!!!
माझ्या ओसाड माळरानात
हिरवाई तू करून गेलीस...
सृष्टीतील सारा मधुगंध
तू लुटून गेलीस
नि माझ्या स्वैर मनाला
प्रेमपाशात गुंतवून गेलीस..!!!
कोणी नव्हते माझे म्हणून
मग मला तुझा कायमचा
तू करून गेलीस...!!
खरंच का इतका तुला
मी आवडलो,
जितकी तू मला आवडलीस???

