इज्जत
इज्जत
ज्या विचारांनी प्रगती दिली, त्यांनीच बंडखोरी शिकवावी.
कुणी पुण्यासाठी मदत केली, कधी वासनेसाठी बनला शिकारी.
शिकार ती कोणाची, माणूस बनून माणसाचीच.
कर्म करून मोकळा झाला, लाज नाही कशाचीच.
लाज असेल ती उजेडाची, आणी जमलेल्या गर्दीची.
कायम आडोश्याच्या अंधारात लुटायची, इज्जत सापडलेल्या दर्दीची.
दुःख ते मुळात नाही, आले होते ते संकट.
संघर्षाचा शेवट आत्महत्या, गावभर सांगतो ओरडत.
बोभाटा झाला सगळा, मरणापेक्षा बळजबरीचा.
तमाशा बघे उभे आहेत, मजेचा खेळ जिवापेक्षा इज्जतीचा.
इज्जती वर हात घालणाऱ्या, किंमत नसे आईची.
हीच तर खरी लढाई आहे, कर्माची आणी विचारांची.
