II स्वागत नववर्षाचे II
II स्वागत नववर्षाचे II
तीनशे पाशष्ट पानाचे पुस्तक म्हणजे एक वर्ष
जसे पान पलटू तसे मिळते दुःख किंवा हर्ष
नवा दिवस, नवं यश, नवी स्वप्न, नवी आशा
नवी नाती, नवी माणसं, नवी ध्येय, नवी दिशा
वर्षानुवर्षे हेच चाललंयदिवस येतात आणि जातात
सरत्या वर्षा निरोप, येणाऱ्या वर्षा चे ही होते स्वागत
नवीन संघर्ष कधी पूर्ण तरकधी अपूर्ण
मन कधीच थकू नये जरी शरीर झाले जीर्ण.
पिढ्यानपिढ्याची जपली जाते आपली संस्कृती
भारतीय संस्कार आपले, शान,श्रद्धा,शांती.
सोनेरी स्वप्नांचा तजेला घेऊन उगवणारा
नव्या किरणांचा असतो हा एक नजराणा
मंदिरातील देवाला ही रोजचाच नमस्कार
पण का हे सर्वच ठरतात सोपस्कार.
बदलत्या जीवनशैली चा होतो का अंगीकार
होणाऱ्या बदलाचा स्वतः आपण करतो का स्वीकार
कुठेतरी दिसावा परिवर्तनाचा आभास
मी पणाचा व्हावाआता पूर्णपणे नाश
एकमेकांतील कमकुवत संवादाची होऊ नये दुर्दशा
खितपत पडलेल्या प्रश्नांनाही मिळावी दिशा
पुढील पिढीला दाखवावाआदर्श
आणि प्रामाणिक पणाचा द्यावा संदेश
चांगल्या विचारांची व्हावी देवाणघेवाण
आणिपरोपकाराची करावी उधळण
देऊ उरवरीत आयुष्याला आकार
वाईट परिस्थितीत असावा एकमेकांना आधार
सत्ताकारणाचे फिरवावे नेहमी दालन
आदरानं थोरामोठ्यांना जपावं आपण
करून आनंदाची बरसात
घर करूया एकमेकांच्या मनात
हातात हात घालुनी स्पर्धेच्या या युगांत
रोजच्या रोजकरू नवीन दिवसाचे स्वागत
नात्यांची शोभा आणि मैत्री-पूर्ण समाज बनवूया
आपुले नशीब आपणच घडवूया
आपल्या हाती देह झिजवुया
हिच नवीन वर्षाची गुढी उभारूया
