STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

1  

Sushama Gangulwar

Tragedy

हुंदका

हुंदका

1 min
326

दगडाखाली आपलेच

हात का असावे?

थोडसं मागते

त्यात पण नकार मिळावे


रोज अंधाराला कवटाळुन

आसवांना का पुसावे

दोष कायमचं माझाच आसतो

असं मान्य करुन मी बसावे 


माझी बाजू मांडुच नये आता

का इतके मी थकावे

ना स्वप्ने बघावे

ना तुझ्याकडून काही आशा करावे


तु म्हनशील त्या परिस्थितीला 

कवटाळुन मी जगावे

येणाऱ्या हुंदक्यांना आवर घालुन

डोळ्यात कचरा गेला असा

मी किती दिवस लोकांना सांगावे


किती दिवस मी फक्त 

तुझ्याच सुखासाठी झटावे

माझ्या आतील दुःख आवरुन

मी नेहमी हसतच तुला दिसावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy