हुंडाबळी
हुंडाबळी
माय बापाची लेक जगात दिसे देखणी
जगात शोभली लेक सुंदर मायेची चांदणी
लेक माय बापाची जीव की असे प्राण
तळहातावर जपले तिचे मायबापाने बालपण
माय बापाची होती ती एकुलती एक
हळव्या मनाची नाजूक,कायेची लेक
सुंदर,देखणी ,जन्म लाभला कुटुंबात
खूप शिकावे स्वप्न तिच्या आयुष्यात
शिकून झाली होती ती मोठी समजदार
स्वावलंबी जीवन जगावे इच्छा आयुष्यभर
सोडून जाऊ नये वाटते बापाच्या काळजाला
सासर कसे मिळेल याची चिंता भासे बापाला
बापाच्या उद्धाराला लग्न करायचं असतं
आई बापाच्या घराला पारख व्हावं लागतं
दोन कुळीचा नावलौकिक स्री जन्मात दिसतो
आई बापाच्या नावाचा उल्लेख त्यात असतो
आले श्रीमंत लोक बघायला मोठ्या दिमाखात
सांगू लागले श्रीमंतीच्या खोट्या गप्पा मोठ्या ऐटीत
बोली लाऊ लागले त्यांच्या मुलाची फार तोर्यात
असे लबाड लांडगे खोटे असते त्यांच्या नितीत
लग्न जुळविले त्यांनी खोटी प्रतिष्ठा सांगून
तेव्हा सांगू लागले नातेवाईक समाजातून
अपेक्षांचा भडीमार त्यानी सतत केला
लेकीच्या लग्नाला एक एकर विकला
असे कर्म दरिद्री लोक आले लेकीच्या नशिबाला
खोटी बढाई मारून लुटले कन्येच्या बापाला
बाप बिचारा झुरत होता मुलीच्या सुखी आयुष्याला
कळत होते सर्व काही पण फास नराधमांचा पडला
चक्रव्युहात त्यांच्या भयानक अडकला
मुलीच्या जीवासाठी काही बोलता न झाला
एक दिवस त्यांनी हुंड्यासाठी विश्वासघात केला
मध्यरात्रीला मुलीचे तोंड दाबून खून भयानक केला
खोटी माहीती देऊन नराधम सहीसलामत सुटले
हृदयविकाराचा झटका आला सांगून मोकळे झाले
सर्व काही रात्रीत पैशावर त्यांनी संपवले होते
कागदोपत्री मात्र खर्याचे खोटे रंगवलेले होते
असे दिवे प्रकाशात येण्या अगोदरच विझले
न्याय,अन्यायाचा दिवस पाहण्यास ते कधी न उरले
अंधारमय जीवन त्यांच्या असते कायम नशिबात
आता खरे लिहिण्याची तरतूद करावी कायद्यात
न्याय मिळावा मेलेल्या जीवाला,तिच्या मायबापाला
शिक्षा असावी कठोर असे वाईट कृत्य करणाराला
वाईट प्रथा,हुंडा,समाजानेच कायमची बंद करावी
स्री पुरुष समानता पुन्हा देशात आनंदाने नांदावी.
