STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

4  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

हुंडाबळी-कविता

हुंडाबळी-कविता

1 min
738

बाई मी ग हुंडाबळी 

का?मी आई बापाच्या पोटी जन्मली !!धृ!!


लहाणचे मोठे केले मला 

शिकून शहाणे केले मला 

जगात स्वावलंबी झाले मी 

स्वत:च्या पायावर उभी आज मी 

 

माझ्या लग्नाची काळजी बापाला 

वर लागला बाप शोधायला 

श्रीमंत घरची लोक आली पहायला 

अपेक्षांचा भडीमार त्यांचा झाला 


बाप माझा साधा पाहिला 

हुंडा लाखोत त्यानी सांगितला 

हातावरचे पोट माहीती त्याला 

दया कुठली हो त्या लोभी माणसाला 


सर्व अटींचा घाट घातला 

गरीब बापाला खर्चात पाडला 

मायभूमी एक बिगा विकला 

बाप भूमीहीन त्याने केला 


लग्न झाल्यावर सासरी सुख नव्हते 

विषारी शब्द त्यांच्या मुखात होते 

आसुरी वृत्ती अंगात संचारली 

दिवस रात्र मला मारू लागली 


बाप ऐकून ढसढसा रडला 

काय आले माझ्या लेकीच्या नशिबाला 

असे निर्दयी लोक कसे मिळाले 

माणूसकीहीन सदा वागू लागले 


वर मंडळी लालची निघाली 

मधून मधून पैसे मागू लागली 

मान मर्यादा त्यानी सोडली 

घाण,घाण शिव्या देऊ लागली 


कसायाच्या दारात गाय बांधली 

काय वेळ माझ्या लेकीवर आली  

अशी आसुरी माणसे जन्माला 

आदर,सन्मान नसे त्यांच्या घराला 


लग्न असावी कमीत कमी खर्चात 

मोठ्या लोकांनी आदर्श दाखवा त्यांच्यात 

समाजाला वाचवावे हुंड्याच्या विळख्यातून 

स्पर्धा, प्रतिष्ठा नको आपसाअपसातून 


 शिक्षा असावी हुंडाबळीची समाजात 

 माणूसकीची वागणूक मिळेल मानवात 

 घ्या समजून समाजाने समाजाला 

 तरच समाज जाईल प्रगतीला 


 मोठ्या जेवण पंगती,नको 

 कपडे, साड्या, लुगडे नको 

रुसवे, फुगवे नात्यात नको 

 आपसात नात्यात झगडे नको 


 महागडे अलंकार ,नको 

लग्नाचे किंमती हॉल नको 

आदर राखावा,अपमान कधी नको 

वधू वर बाप नको बेघर, कधी भूमीहीन नको.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy