STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

2.7  

Prashant Shinde

Fantasy

हत्ती...!

हत्ती...!

1 min
2.8K


हत्ती म्हटल की

गणपती आगमनापासून

सुरू होणारी कहाणी

गणपती विसर्जन करूनच

सारा घोषवारा चव्हाट्यावर मांडते


मग हौसे नवसे गवसे

सारे तोंड सुख घेतात

हात धुवून घेतात

आणि पुन्हा

स्वच्छ होऊन कामाला लागतात


घोषवाऱ्यावर प्रतिक्रिया देताना

आवर्जून सांगतात

बायकोचे बाबा खायचे दात

आणि दाखवायचे दात वेगळे असतात

तसच इथं असतं


पटलं मला आणि तेव्हापासून

गणपती मला आवडू लागला

आमच्या घरी गणेश उत्सव

मोठया उत्साहात पार पडू लागला


आणि हत्तीणीच पिल्लूसुद्धा

खायचे दात पाहण्याचा हट्ट धरू लागलं

यालाच म्हणतात

भावी पिढी घडवणं आणि

वारसा पुढे चालवणं, किती छान....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy