STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

4  

Shital Yadav

Inspirational

हरवली वाट

हरवली वाट

1 min
598

केशरी रंगात न्हाऊनी गेली रम्य पहाट 

धुक्यात आठवांच्या कधी हरवली वाट


वाढली तृष्णा ही चातकापरी जीवाची

होता प्रीतिवर्षा वाहेल भावनांचा घाट


बघतो वाट कालिंदीचा हा काठ निरागस

पुन्हा कधी गोप-गोपिकांचा जमेल थाट


बेभानपणे चित्त लागते सावळ्या चरणी 

दर्शनास व्याकूळलेले मन धावते सुसाट 


अधीरता संपव भेटीने कर जीवनउद्धार 

अखंडित वाहो आयुष्यात भक्तीची लाट 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational