STORYMIRROR

Pranoti Markande

Tragedy

3  

Pranoti Markande

Tragedy

हरवली पाखरे कोणीकडे?

हरवली पाखरे कोणीकडे?

1 min
236

तोडली, तोडले रान आणि वन पार,

इमारती मोठ्याला उभारल्या जागोजागी फार. 


कधी कोणी केला ओ त्या रानातल्या पाखरांचा विचार?

त्यांची घरे उध्वस्त करून माणूस राहिला भिंतीत चार.


पक्षी आणि पाखरांची केली फरफट,

म्हणूनच का आले मनुष्यावर दुःखाचे सावट.


रानातील पाखरांना हवे भटकायला मोकळे रान आणि घ्यायला मोकळा श्वास,

तेच हिरावून माणसाने का धरलाय हा निष्ठुर ध्यास?


सृष्टीतील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे,

मग माणूस का म्हणून रानातल्या पाखरांचा हा हक्क हिरावू पाहे?


रानातील पाखरांची घरे उध्वस्त करून आहे का ओ माणूस सुखी,

काय मिळवलं त्याने करून या रानातल्या पाखरांना दुखी?


तान्ह्या बालकांना दाखवायला राहिलीच नाहीत पाखरं नभाकडे,

नष्ट करून त्यांचे घरटे हरवली पाखरे कोणीकडे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy