STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Abstract Tragedy Classics Others

4  

Kavita Sachin Rohane

Abstract Tragedy Classics Others

हरवलेली चिऊताई

हरवलेली चिऊताई

1 min
280


हरवलेली चिऊताई
माणसांच्या या जंगलात
कुठे तुला शोधू
हरवलेल्या माझ्या चिऊताई साठी
घरटं कुठे बांधू..
आधी बरं होतं ग
सारखा तुझा चिव चिवाट येत होता कानी..
आता मात्र वाट बघावी लागते की
केव्हा येईल माझी चिऊ राणी..
लहान लहान मुलांना सुद्धा
आता चित्रातच तू दिसतेस
प्रत्यक्षात तुला बघायला गेलं
की दडून कुठेतरी बसतेस..
दोष यात कुणाचा काहीच कळत नाही
 पण तुझ्या अस्तित्वासाठी लढणारे
 आहेत जगात अजून काही..
असं नको ना चिऊताई तू हरवून जाऊस
 दाणापाणी तुझ्यासाठी काढलेल आहे
 ते कुणाला बरं आता मी देऊ..
तुला परत आणायला मन आता आतूरले
म्हणूनच कदाचित आम्ही सर्वानी
स्वतःला सावरले..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract