हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
शोधतोय हरवलेले बालपण
बागेतील टांगलेल्या झुल्यावर
वडपारंबीवर लोंबकळून
झरझर चढायला झाडावर
शोधतोय हरवलेले बालपण
लडिवाळ मोत्याला खाऊ देताना
मनीमाऊला दूध भरवताना
कोंबडीचे अंडे हळूच घेताना
शोधतोय हरवलेले बालपण
दादा ताईचे लाड अनुभवत
वडिलांचा राग रडून पाहत
मांडीवर आजीच्या डोके टेकत
बालपण हरवलेले शोधायला
सवंगडी आणायचे जमवून
पुन्हा कट्ट्यावर झुलते तिथे
एकदिलाने रंगवू बालपण
