आली माहेरी...
आली माहेरी...
1 min
540
आली माहेरी किती दिसांनी माझी ताई
खूष झाली अबोली, हासली जाईजुई
पाहे वाकून मोगरा, हळव्या ताईचा कोपरा
भेट होता सखीची, कसा झाला गोरामोरा
नको बहाणा सासरचा, रोष भारी सदाफुलीचा
सदा आम्हांं भेटायचा, भाव फुलावा मनाचा
तनु इवली धम्मपिवळी, बटशेवंती त-हा वेगळी
कसा छळे घरचा माळी, परि फुलांची सांगे कागाळी
काया वाहतो तुझ्या चरणी, गुलाब करि मनधरणी
असे रिक्त घरी फुलदाणी, चर्या माझी केविलवाणी
फुलवेडी माझी ताई, फुलांफुलांत हरवून जाते
फुले तिचे अनोखे नाते, फुलांत वेगळे मूल पहाते
