STORYMIRROR

Vivekanand Marathe

Romance

3  

Vivekanand Marathe

Romance

मृद्गंध पावसात

मृद्गंध पावसात

1 min
209

क्षण खुणावतो मजसी

आतुरता तुझ्या स्पर्शात

मन होई ओले माझे

मृद्गंध पावसात.......१


वेडावला जीव माझा

तुला शोधतो मिठीत

हुरळून जाई तन माझे

मृद्गंध पावसात.......२


कागदाची होडी कुणाची

हळू तरंगते पाण्यात

कुठे हरवले बाळ माझे

मृद्गंध पावसात.......३


किती वाट पहावी तुझी

आली लाही अंगात

निथळून गेला गारवा

मृद्गंध पावसात.......४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance