उभ्या श्रावणी
उभ्या श्रावणी
1 min
285
नवी नववधू , हिरवा शालू
जणू लेवून घेत शिरावर
मोर नाचतो पहा कुठेही
उभ्या श्रावणी जर पदरावर
येते नाचत धावत पाणी
शीळ वाजवी घोकत गाणी
घेई मिठीत तरूवेलींस
ओलसर देत त्या आठवणी
लोभस सुंदर रानफुले
करी फैलाव मृदगंधाचा
खळखळ मंजुळ ओढ्यासंगे
खेळ चालतो बघ अवनीचा
