मज आधार ताईचा
मज आधार ताईचा
1 min
131
किती गुण गाऊ ताई
तूच माझे सर्व काही
माझी घेतसे काळजी
जणू दुसरीच आई
तुझ्याविना कोण माझी
सांग दाखवते चूक
वेळोवेळी देते सल्ला
कान धरीशी अचूक
मोठी झालीस शिकून
आता कायदेपंडीत
बोल तुझे परखड
नाही कोणीही वादात
तुझ्या सासरच्या घरी
सर्व सुखांचा आनंद
वाण नाहीये कशाची
पुरे पडे मोजदाद
आज अकस्मात ताई
सांग कुठे बिनसले ?
घर छान विचारांचे
कोणी कसे दुभंगले ?
सांगे ठासून सर्वांना
मज आधार ताईचा
चक्र फिरले उलटे
झालो आधार ताईचा
