हरवले रत्न
हरवले रत्न


हरवले रत्न
' पुष्पाग्रज '
हरवले रतन
पोरका झाला भारत,
गाऊ त्यांची आरती
किर्ती अविरत.
केवढी देशभक्ती
होती रक्तात, श्वासात,
दिले दान देशाला
महात्म्याने अगणित.
नावाचे रतन
खरे रत्न ते होते,
मानवता मूल्ये
गेले शिकवून नाते.
न झाला न होणारं
असा दानशूर,
टाटा चे ते वारस
झाले खरे अमर.
जगी उरले नाही
जरी हरवली मुर्ती,
अर्पीतो श्रध्दांजली
अमर त्यांची किर्ती.
आत्म्यास शांती लाभो,
करु सारे प्रार्थना,
महात्मा ते रतन
कोटी वंदन त्यांना...
गायकवाड आर.जी
दापकेकर जि.नांदेड