होळी
होळी
फाल्गुनी पुनव, लख्ख प्रकाश
शीतल गारवा,दुधाळलं आकाश.
असं सारं उत्साहवर्धक बाहेरचं
अंतरी मात्र विरोधाभास.
होळी साजरी करतोय म्हणाले
पण स्विकारतय कोण उदात्तता.
अन कोण जाळतंय कचरा,
मळ मनीचा.
इथे तर आसुरी थयथयाट.
अमंगळ......!
जपावी म्हणालेत संघनिष्ठा
होळी मनवुन.अन खेचताय तंगड्या.
कापतायेत पंख पक्षिणीचे.
म्हणे होळी दिक्षा देतेय संयमाची
अन नाचतात सारे बेताल.
मद्यधुंदीत उडवित रंग,म्हणत.
"आले रे होळी...करा धमाल."
वाजतायेत गाणी वास्तवतेची.
चित्र चितारणारी.
"लोंगा ईलाची का बिडा बनाया
खाये गोरी का "यार"
&
nbsp;बलम तरसे ......रंग बरसे.."
फेर धरून नाचतायेत उडवित
पिचकाऱ्या रंगांच्या.
लाल बेताल झालेला
हिरवा अवकाळीनं गिळलेला
गुलाबी तर तकलादू विलायती
निळ्याची विशालता अन शांती
पांढरा साऱ्यात मिसळलेला
काळा मनामनात घुसळलेला
ओरडतायेत.
"होळी रे होळी,पुरणाची पोळी
होळी ला गोवऱ्या पाच पाच
ला डोई घेऊन नाच नाच.."
इथं माती जीवाची बळीराजाची
नाचतोय दुष्काळ डोळ्यावर त्याच्या!
ठोकताहेत बोंबा
अनिष्ठतेला पळवून लावण्यासाठी
पण आतलं अनिष्ठ जळतंय कुठं?
जाळतोय वसंत ओकत उरातल्या झळा.
झोपडीत पेटलीय भूक
आणि धगधगती होळी
तिच्या उभ्या आयुष्याची.