STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

हमामा घाली राम अवतारीं

हमामा घाली राम अवतारीं

1 min
14.1K


हमामा घाली राम अवतारीं ।

कैकईची भीड तुला भारी ।

प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥

हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥


हमामा घाली नंदाघरीं ।

मिळोनि गौळियांच्या नारी ।

गोपाळ नाचती गजरीं ॥२॥


हमामा घाली पंढरपुरी ।

.पुंडलीकाची भीड भारी ।

गोपाळ नाचती गजरीं ॥३॥


हमामा आषाडीकार्तिकीचा ।

साधुसंत गर्जती वाचा ।

एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics