हळद कुंकू
हळद कुंकू
गोड बोलणे छान वागणे
संक्रांतीचे वाण वाटणे
फुले वेचणे माळा करणे
केसात बरी फुलें माळणे
हिरवा शालू तशी बांगडी
गोऱ्या हाती छान घालणे
तिळगुळ लाडू सर्वां देणे
गोड बोलणे शब्द पाळणे
संक्रातीला पतंग उडवू
रिवाज अपुले मस्त राखणे
संक्रातीची रीत आपली
सुगडाला ते छान सजवणे
सौभ्याग्याचे मणी घालुनी
पुजेला तसे छान लावणे
सौभ्याग्याचे लेणे देणे
हळदीकुंकू बाया करणे
सण आनंदी उत्साहाचा
बायांचा तो छान पाहणे
