हिवसाळा
हिवसाळा
हल्ली हिवाळ्यात
नित्यनेमाने पाऊस पडतो
गमतीने ह्या ऋतूला आपण
हिवसाळा असे म्हणतो
आधीच हिवाळ्याची
थंडी काय कमी असते
पाऊस बरसल्याने
त्यात अजूनच भर पडते
हिवाळ्यातील हिरवळीचे कार्यक्रम
गुंडाळावे लागतात
पावसाचे थेंब अचानक येऊन
सगळा विचका करतात
लोकांची सुरू होते पळापळ
स्वतःचा बचाव करायला
काही उत्साही जोशात येतात
मिळतं त्यांना भिजायला
घ्यायचा स्वेटर की रेनकोट
असा संभ्रम निर्माण होतो
शेवटी येईल त्या परिस्थितीला
आपण धीराने सामोरे जातो
