STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Inspirational Others

हिरवाई

हिरवाई

1 min
240

आला पहिला पाऊस 

मन घेती उभारी बहार 

पशु-पक्षी आनंदी सारे

गाणे गाती ऐका शिवार


धरा पाही आकाशाकडे 

काळे ढग चहुकडे दाटी

पहा झाली आतुर सजणी 

प्रिय सजणाच्या भेटीसाठी


आला पहिला पाऊस 

रानावनात नाचती मोर 

गारा वेचण्या धावती

छोटी-मोठी पोरंसोरं


येतो सोसाट्याचा वारा

वीज कडाडे आकाशी  

बळीराजा सुखावला

जसे नाते असे माझ्याशी 


थेंब मातीत पडला

झाली धरणी धुंद

पसरतो आसमंती 

कसा कस्तुरी-सुगंध 


हिरवाईने नटले पहा

शिवार कसे माझे सारे 

आनंद गगनात मावेना 

हिरवाईने लाजले सारे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational