हिरवा निसर्ग
हिरवा निसर्ग
हिरवा निसर्ग
दरवळला चहुकडे
आसमंत प्रसन्न
मनालाही आवडे
फळे-फुले ही
लागती सजुनी
देण्याचा गुणधर्म
निसर्गाचा जाणुनी
निसर्ग महिमा
सांगणे शब्दात
सूचेना शब्द
उतावीळ लिहिण्यात
आई सम सांभाळ
म्हनावा होईल
अतिशयोक्ती
कोण समजेल
मात्र जोपासना
आहे मानवा हाती
कारण जीवन
हेच सुधारती.
