हिच्या भुताशी गप्पा चालते ...
हिच्या भुताशी गप्पा चालते ...
कधी ऐकटेच हसते ,
मनातल्या मनात रडते ,
तुटते तुकड्या तुकड्यात ,
स्वतःच स्वतःला सावरते ,
तेव्हा बोलते अन् जगास वाटते ,
हिच्या भुताशी गप्पा चालते...
कुणाला दाखवायचे,
अपयशाने बसणारे चटके,
निराशेने होरपळणारे मन ,
विव्हळणाऱ्या भावना ,
वेदनेने घायळ सांज ,
तुटते तुकड्या तुकड्यात ,
स्वतःच स्वतःला सावरते ,
तेव्हा बोलते अन् जगास वाटते ,
हिच्या भुताशी गप्पा चालते...
कोण येणार दिलासा द्यायला ,
म्हणुन प्रयत्न तुच कर म्हणून,
प्रेरणा देते मनाला ,
खडसावून सांगते स्वतःला,
शर्यत अजुन संपली नाही ,
तु अजुनही जिंकली नाही ,
धावते पळते परत उठते ,
रस्ता किती परीक्षा पाहिल ,
एक दिवस तर ध्येय समोर येईल,
म्हणून धिर देते मनाला जरी,
तुटते तुकड्या तुकड्यात ,
स्वतःच स्वतःला सावरते ,
तेव्हा बोलते अन् जगास वाटते ,
हिच्या भुताशी गप्पा चालते...
