STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

हात मेंदीचा

हात मेंदीचा

1 min
206

पुन्हा छेडलीस सप्तसुरी ती तार,

हात मेहंदीचा रंग चढे गालावर.

चांदण शिंपत आलेली सुप्रभात,

स्पर्शगंध मधुचंद्राचा झुले मनावर.


सय शतजन्मांच्या शपथा स्मरून,

नववधूचा तो सुखद क्षण सोहळा.

आकाशवर्णी शृंगारात सजे अप्सरा,

हात हात देत मुखचंद्र तो लाजला.


गेला तो क्षण फुलवून मोरपिसारा,

कस्तुरी मृदगंध रोमरोमात भरूनी.

संघर्षमयी जीवना आदर्श शिकवून,

नवचैतन्याची पालवी येई बहरून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational