STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

हारलेली प्रीत

हारलेली प्रीत

1 min
239

ती मला जे गीत गाते, त्यात कोठे प्रीत नाही 

मी कसे सांगू तिला ही, जीवनाची रीत नाही  


वाट पाहू केवढी मी, आज येथे एकट्याने 

हा युगांचा खेळ ज्याला, हार नाही जीत नाही 


गांजला आहे इथे, जो तो प्रवासी चाललेला 

दाखवा मज हासणारा, आसवे जो पीत नाही 

 

 हाय! एका वादळाने , रोखली ती नाव माझी 

वादळी सांभाळणारा, मज मिळाला मीत नाही 


ते नको कापूर आता , देह जळतो आसवांनी 

करपले रे स्वप्न माझे, ते अता रंगीत नाही 


भान नाही रे कशाचे, चाललो वाऱ्यासवे मी 

ठोकरा देतात सारे, मी तयांना भीत नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy