STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract Tragedy Others

2  

Latika Choudhary

Abstract Tragedy Others

हार नाही

हार नाही

1 min
2.5K


हार नाही आसवांना गाळताना

जीत झाली यातनांना पाळताना

पत्थराचे दैव भाळी जोडलेले

अर्थ आला त्या फुलांना माळताना

पाहते मी सागराला आटलेला

चिंब झाले त्या तळाला टाळताना

घाव होता काळजावर हाय माझ्या

नाचले 'ते' वेदनांना चाळताना 

जाणले मी आज माझ्या जन्म मरणा 

जिंकलेल्या जीवनावर भाळताना  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract