हाक
हाक
आर्त हाक ईश्वराला
घालतसे कोण बरे
मातीतून उगवले
इवलेसे रोप खरे...१
अनेकांना कालांतरी
दाट सावली देईल
होऊनीया वटवृक्ष
सर्वां आधार होईल...२
आर्त हाक ईश्वराला
घालतसे कोण बरे
जन्मा येण्या अगोदर
कळी गर्भातच मरे...३
गुदमरे जीव तिचा
आर्त हाक ईश्वराला
गर्भातूनी ओरडून
घालतसे जगण्याला...४
वाजे टाळ मृदुंग ही
विठू नामाचा गजर
दुमदुमे राऊळाला
असे सर्वत्र हजर...५
नष्ट कर हा करोना
पसरला हाहाकार
तार तुझिया लेकरा
दाव तुझा चमत्कार...६
