हा सागरी किनारा
हा सागरी किनारा
हा सागरी किनारा...
मज आवडे तुझा सहारा
घेता मला कवेत
मोहरती माझ्यासवे
ही सांजवेळ...
आठवी मी तुझी शाब्दके
कासावीस करी तुझा
हा जीवघेणा विरह...
मी निरंतर जीवास माझ्या
तुझ्यात देहभान हरपून गुरफटावे
तू ही मला बिलगून लपेटून घ्यावे
हा सागरी किनारा
मज आवडे तुझा सहारा

