हा क्षण
हा क्षण
अश्रूंसोबत वाहत जाणारा
जगण्याची नवी उमेद देणारा
प्रत्येकाच्या आयुष्यातला असा
"हा क्षण "
आनंदाची येता भरती
दु:खाची सुरु होते ओहोटी
फेसाळलेल्या समुद्रासाठी असा
"हा क्षण"
ओठावर येणारा क्षणिक राग
हृदयात असलेली प्रेमाची लाट
दोघांचे मिलन होता डोळ्यात असा
"हा क्षण"
कानांनी ऐकलेले खरे
की डोळ्यांनी पाहिलेले खरे
आपण अनुभवतो जे प्रेम असा
"हा क्षण "
वरवरचा असलेला अबोला
मनात चाललेला हळूवार संवाद
अबोला सुटताच भेटण्याची आस असा
" हा क्षण "
भेटता क्षणी हात हातात घ्यावा
की हळूवारपणे मिठी अनुभवावी
मनात असते चलबिचल असा
"हा क्षण "
असे अनेक सुखद क्षण
दु:खानंतरची असते वहिवाट
अशाच क्षणांना सोबत घेऊन
ऱोज उगवते एक आशेची पहाट