गुरूमहिमा
गुरूमहिमा


गुरूवीण कोण । दाखविल वाट।
अवघड घाट । आयुष्याचा ।।
गुरूच पाजतो । ज्ञानामृत कण ।
पिऊनिया मन । झाले तृप्त ।।
अंधाराची वाट । प्रकाश दाविला ।
गुरू हो भेटला । सानथोर ।।
वडिलांची माया । आईचे संस्कार ।
स्वप्न हो साकार । झाले आज ।।
गुरूविण कोण । देईल आकार ।
जणू तो कुंभार । होवूनिया ।।
चराचरात तू । रूप तुझे छान ।
गुरूला रे मान । वंदुनिया ।।
गुरूवीण कोण । ज्योत तो पेटवी ।
अज्ञान मिटवी । जगाचिया ।।
गुरूचे आशिष । ज्ञानी बनविते ।
मीनाक्षी सांगते । ठेव ध्यानी ।।