STORYMIRROR

Medha Desai

Inspirational

4  

Medha Desai

Inspirational

गुरूचे महत्त्व

गुरूचे महत्त्व

1 min
566

माणसाच्या जीवनात गुरूचे महत्त्व

कधीही अगदी अनन्यसाधारण असते

त्याच्या जीवनाला आकार देऊन

मार्गदर्शनाने कल्याण होताना दिसते


मुलांचा पहिला गुरू आईच असते

ती जीवनाचा शिल्पकारच ठरते

मुलांसाठी आयुष्यभर खस्ता खाऊन

त्यांच्यावर माया ममतेची पखरण करते


ज्ञानदान करणारा शिक्षक तर

नेहमी माणसाला नवी दृष्टी देतो

नवनव्या विषयांची माहिती देऊन

मुलांच्या जीवनात गुरूच्या रूपाने येतो


शालेय जीवनातच अभ्यासाची गोडी लावून

शिक्षक उद्याचे सुजाण नागरिक घडवतो

शिक्षण क्षेत्रात भरघोस कामगिरी करून

समाजात प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक बनतो


जन्मदाते आईवडील मुलांचे संगोपन करताना

आयुष्यभर राबून त्यांना पोसतात

मुलांसाठी महत्त्वाची भूमिका बजावताना

त्यांना ते कायम पाठबळ देत असतात


संस्कारांचा खजिना आईवडीलच देतात

मुलांना पुढे ते संस्कार आयुष्यभर पुरतात

शिक्षकही शिक्षणाचा भक्कम पाया रचून

मुलांना स्वतःच्या पायावर उभे करतात


सध्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात

माणसाला शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही

पैसे कमावून उदरनिर्वाह करण्यासाठी

विद्येचे महत्त्व अनन्यसाधारण राही


अशा या महान गुरूंची किमया

माणसाला नेहमी प्रगल्भ बनवते

आणि या गुरूंची प्रभावी शिकवण

जगण्यासाठी माणसाला योग्य मार्ग दाखवते


अशी ही गुरूची जीवनातील अगाध महती

कधीही विसरू शकत नाही, न संपणारी असते

पावलोपावली माणसाच्या जीवनात

कार्यरत राहून अंतापर्यंत दिसत राहते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational