STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

4  

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

गुरुमहिमा

गुरुमहिमा

1 min
394

ज्ञानाचे महासागर 

देशभक्ती चे जागर,

चारित्र्याचे आगार

गुरू महिमा आहे थोर


सदाचारी, सद्वर्तनी

महाज्ञानी आणि गुणी,

टेकवावे माथा चरणी

असे लाभावे गुरू जीवनी


करावा उत्कर्ष

जोपासावा आदर्श,

योगदान सहर्ष

गुरू परिसस्पर्श


महापुरुषांचा वारस

त्रिलोकी सदा सरस,

समाजाचा परीस

गुरू दिव्य आम्हास


नीतीचे उपासक

मूल्यांचे रक्षक,

दुष्टांचे भक्षक

गुरू जीवन शिक्षक...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract