Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

4.5  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

गुरु महिमा

गुरु महिमा

1 min
284


लघूलाही गुरू करतील असे 

असावे गुरू स्वयंप्रकाशी |

त्यांच्यावरून उधळून टाकाव्यात

समस्त ब्रम्हांडातील नक्षत्र राशी | |१| |


गुरू असावा अंतरातल्या ईश्वर

तत्वाशी भेट घडवून देणारा |

गुरू असावा अज्ञानाच्या तमातून

ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा | |२| |


गुरु शिष्यासाठी या भवसागरी

दीपस्तंभा समान असावा |

अपयशात शिष्यास नैराश्याच्या

गर्तेत एकटं सोडणारा नसावा | |३| |


गुरू असावा सदैव शिष्याच्या

पाठीशी राहणारा खरा मित्र |

दिसावे सदैव त्याच्या नयनी

शिष्याच्या भवितव्याचे चित्र | |४| |


वर्णावा तरी काय किती अन् 

कशा शब्दात गुरुचा महिमा |

गुरू असतो अमर्याद ज्ञानाचा 

सागर ज्याला नसतेच सीमा | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract