STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

1 min
3.2K


गुंतता हृदय हे

नजर तू वळवलीस

ठोका चुकला काळजाचा

जेव्हा मान तू झुकवलीस

अल्लड माझी साजणी

गालातुनी हसली

गुलाबाची कळी फुलली

जेव्हा बट बोटात फसली

सोडवताना गुंता सारा

तू अजून गुंतत होतीस

तुला न्याहाळताना

स्पंदनेही वाढत होती

धकधक हृद्यातली अन

उठलेला काहूर

समजत होता तुलाही माझ्या

अंतरीचा ऊर

तुलाही हे उमजत नव्हते

मज उमजूनही कळत नव्हते

वेडे दोन हृदय

प्रेम बंधनात अडकले होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance