गुलमोहर
गुलमोहर
ह्या रखरखत्या उन्हातही,
रानावनातला गुलमोहर बहरला होता,
जणू काही स्वतःचं दुःख लपवत होता,
ह्या गुलमोहरासारखी असतात काही माणसं,
जी ज्याच्या संपर्कात येतात त्याला बहरून टाकतात.
स्वतः मात्र उन्हाचे चटके सोसत असतात कोणालाही कळून न देता.
