गुलमोहर
गुलमोहर


"गुलाब" देखणा असतो
त्याही पेक्षा सुंदर तू भासतेस,
बहरणारा "चाफा" सुद्धा हिरमुसतो
जेंव्हा नायनांना माझ्या भुरळ घालतेस.
"चमेली" असो की असो "पारिजात"
वाटतं त्यांना रंगही तूच देतेस,
सुगंधासवे "मोगऱ्याच्या"
तूच तर दरवळतेस.
डोळ्यांच्या किनारपट्टीवर उतरलेल्या अश्रूंमध्ये
तू "कमळासारखी" उमलून येतेस,
डौल निराळाच तुझा
जेंव्हा तू "रातराणी" सारखी दिसतेस.
मी देतो माझी मलाच "गुलमोहराची" उपमा
त्यावर तू अशी काय हसतेस,
पण हे माहितेय का तुला
वाट चालताना तू नेहमीच मला पायदळी तुडवतेस...