गुलाब लाजतो...
गुलाब लाजतो...
तुला हात जोडून सांगतो
देवाकडे तुला मी मागतो
तुझ्या आठवणीत सखे
माझा श्वास चालतो...
कसं देऊ तुला गुलाबाचं फूल मी
गुलाब ही तुला पाहून लाजतो....
कच्चं वयआहे तुझ सतरा
नखरा तुझा जसा खतरा
अगं माझ्यावर तू रागवू नको
मी वेडा तुझ्यावर प्रेम करतो....
चल लवकर ये तू हात पकड माझा
सावळा रंग आहे तुझा फक्त माझा
माझा जीव तुझ्यासाठीचं झुरतो....
हा संगम पाईप लाइन वाला झाला वेडा
चल लवकर दे मला तू प्रेमाचा पेडा
अगं चारी दिशांना तुझाचं चेहरा दिसतो....

