गुढ
गुढ
तुझ्या मिश्किल हसण्याचे
गुढ उलघडते आहे आज
संयमी स्वभावाने तुझ्या
नाही केला कधी आवाज
कमी बोलून व्यक्त होणं
तुला कस काय जमतं
ध्येयामागे धावणार मन
सांग तरी कशात रमतं
साध्य होणार नाही असे
कुरवाळत नाहीस कधी
हसऱ्या चेहऱ्यामागे काही
दुःख लपवलेस का आधी
प्रेम ही तुझ आहे सख्या
तितकच निर्मळ निर्व्याज
लादल नाहीस कधीच ओझ
ते तर मौल्यवान साज
आपलेपणाच्या बेड्यासुद्धा
घातल्या नाहीस कधी
विचारांचा मान राखायचा
प्रयत्न केलास आधी

