STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Fantasy Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Fantasy Inspirational

गर्जा महाराष्ट्र

गर्जा महाराष्ट्र

1 min
139

एक मुखाने करू गर्जना

 जय जय महाराष्ट्र माझा

येथे जन्मले येथे रांगले

बाळ शिवबा राजे आमुचा


एक मुखाने करू गर्जना

जय जय महाराष्ट्र माझा


जरी असतील विभिन्न जाती 

तरी झरा वाहे मानवतेचा

समृध्दी अन् परंपरेने 

नटलेला महाराष्ट्र माझा


एक मुखाने करू गर्जना

जय जय महाराष्ट्र माझा


महाराष्ट्राचे निशाण भगवे

फडके भगवा भुवरी आमुचा

सह्याद्रीच्या कडे कपारी 

नाद घुमतो जय मराठीचा


एक मुखाने करू गर्जना

जय जय महाराष्ट्र माझा


शुर वीरांची पवित्र भुमी

येथे सांडले रक्त वीरांचे

पराक्रमी शुर वीर शौर्याचे

शिवरायांच्या बलीदानाचे


एक मुखाने करू गर्जना

जय जय महाराष्ट्र माझा


माय मराठी मायबोली आपुली

दिड हजार वर्षांपूर्वीचा

इतिहास सांगे महाराष्ट्राचा

जय महाराष्ट्र नारा आमुचा


एक मुखाने करू गर्जना

जय जय महाराष्ट्र माझा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract